1) खून – नायगाव
नायगाव तालुक्यातील गडगा येथे १७ वर्षीय जीशान लतीफ सय्यद शेख ह्याचा खून करण्यात आला. संशयित आरोपी ने गळा आवळून खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध तपास सुरू केला आहे.
2) शासकीय कामात अडथळा – हदगाव
हदगाव तालुक्यात दत्तवाडी तांड्यावर सरकारी पथक अवैध पशुखाद्याच्या तपासणीस गेले असता पथकावर काही लोकांनी अडथळा आणून सरकारी कामात विघ्न निर्माण केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3) लोहा
लोहा तालुक्यातील गंगाखेड-ते लोहा रस्त्यावर गजानन परसराम राऊत (वय 25) याच्याकडून 7860/- रुपये किमतीचे विदेशी दारूचे 65 लीटर अवैध साठा पोलिसांनी जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
4) विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या – मुदखेड
मुदखेड तालुक्यातील टाकळे येथील शेतकरी वाघोजी व्यंकटराव शिंदे (वय 36) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
👉 सर्व प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.












