नांदेड, दि. ३० ऑक्टोबर माधव वाघमारे
हदगाव व मराठा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या इसमांवर गुन्हा दाखल करून तब्बल ₹३० लाख ५१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता उमरखेड-वरणगा रोडवर करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्र. ३६५/२०२५, कलम ११(१) – प्राण्यांवर क्रूरतेने वागणुकीस प्रतिबंध करणारा अधिनियम अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, तसेच मा. श्री डी. एस. हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोकर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत श्री संकेत दिघे (पोलीस निरीक्षक हदगाव), श्री विलास साहेब (पोलीस निरीक्षक मराठा), साई पोलीस निरीक्षक गिरी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल शामराव खनपटे, अतुल नागरगोजे, युवराज राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
आरोपींची नावे:
१. सोनबा बालाजी वानखेडे (रा. दगडवाडी, ता. हदगाव)
२. शेख रिहान जिलानी (रा. अर्धापूर)
३. शाकीर बलिसाब (रा. हदगाव)
४. शेख सोहेल शेख अजित (रा. महागाव)
५. मोहम्मद परवेज मोहम्मद शफी
६. शिवाजी वामन उमाटे
७. तानाजी वामन उमाटे
८. गफार आबाद शेख (रा. कबनूर)
९. शान रफिक कुरेशी (रा. मुक्रमाबाद)
जप्त मुद्देमाल:
- बोलेरो वाहन क्र. MH-26 — किंमत ₹7,00,000
- जनावरे (मध्य सात महेश) — किंमत ₹56,000
- बोलेरो वाहन क्र. CH-29-15 — किंमत ₹8,00,000
- बोलेरो वाहन क्र. MH-13-CU-4129 — किंमत ₹5,00,000
- बोलेरो वाहन क्र. MH-269 — किंमत ₹5,00,000
- चार गाई जनावरे — किंमत ₹1,20,000
एकूण मुद्देमाल: ₹30,51,000
या कारवाईने परिसरातील अवैध जनावर वाहतुकीवर मोठा आळा बसला असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.












