नांदेड दि. २ ऑक्टोबर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अबिनाश कुमारयांच्या आदेशानुसार आणि श्री अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज गुरव. श्री पंढरीनाथ बोधनकर पोलीस निरीक्षक लिंबगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जि.प. शाळे समोर दारू विक्री करणाऱ्या टपरींवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत आरोपी अशोक नामदेव नवरे (वय ४८), राम सखाराम नवरे (वय २९) आणि बालाजी विठ्ठल सोनकांबळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २३/०९/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवर आधारित होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून JCB च्या साहाय्याने दारू विक्री टपऱ्या उध्वस्त केल्या. लिंबगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ६५(ई), ८३, मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध दारू विक्री, वाहतूक किंवा साठा करत असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी. अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.












