नांदेड, दि.८ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत हद्दपार केलेला इसम परत येऊन वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, नांदेड ग्रामीण पोलिसांचे ही एक महत्वाची कामगिरी समजली जात आहे.
याप्रकरणी आरोपी
ज्ञानेश्वर नरहरी पुंड (वय 39 वर्षे, व्यवसाय – ऑटोचालक, रा. रामनगर कोठा, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
माननीय श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या “ऑपरेशन फ्लॅश आऊट” अंतर्गत हद्दपार आरोपी मिळून आल्यास त्वरित कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे माननीय श्री ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरील इसमावरून हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस दंडाधिकारी नांदेड यांनी कलम 56, महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे हद्दपारी आदेश जारी केला होता.
परंतु सदर हद्दपार इसमाने आदेशाचा भंग करत पोलिस ठाणे ग्रामीण हद्दीत लपून-छपून वास्तव्यास असल्याचे आढळून आले. यानंतर त्याला ताब्यात घेऊन कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत
ज्ञानेश्वर मठवाड (पोलीस उपनिरीक्षक)
मारुती पचलिंग
संतोष पवार
विष्णू कल्याणकर
यांचे विशेष सहकार्य राहिले.
पुढील तपास नितीन मुसळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनची ही कारवाई हद्दपारी आदेशांचे कठोर पालन व कायदा सुव्यवस्था रखण्यासाठी प्रभावी पाऊल असल्याचे बोलले जात आहे.












