नांदेड, दि. 28 ऑक्टोबर (प्रतिनिधी) – माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत दोन हायवा वाहनांसह तब्बल ₹75 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी केली असून पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक रोखण्यात यश आले आहे.
ही कारवाई मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, आणि मा. श्री सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईचे नेतृत्व :
श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड
पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकात श्री प्रभाकर मलदोडे, श्री श्रीराम दासरे, श्री संघरत्न गायकवाड, आणि श्री संजय राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
घटनेचा तपशील :
मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाईसाठी रवाना केली.
या दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लोहा ते माळाकोळी मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा आढळले. त्यापैकी एक हायवा माळेगाव टोल नाक्याजवळ तर दुसरा खेडकरवाडी परिसरात पकडण्यात आला.
दोन्ही वाहनांमधून एकूण 10 ब्रास (प्रत्येकी 5 ब्रास) अवैध वाळू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दोन हायवा वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत ₹75,50,000 इतकी आहे.
अटक आरोपींची माहिती :
- असलम हसन पठाण (वय 45 वर्षे) – व्यवसाय चालक, रा. इंदिरानगर, लोहा, जि. नांदेड
- गणपत रावसाहेब कोलमवाड (वय 27 वर्षे) – व्यवसाय चालक, रा. पेनूर, ता. लोहा, जि. नांदेड
या प्रकरणी पोलीस स्टेशन माळाकोळी, जि. नांदेड येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बोमले आणि पोलीस कॉन्स्टेबल नामदेव राठोड हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, मा. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील,मा. अबिनाश कुमार, पोलीस












