शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय नांदेड येथील विद्यार्थिनी कु.वैशाली राजू अकुलवाड हिने LL.B. या अभ्यासक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या मेरिट यादीत द्वितीय क्रमांक (2nd Rank) मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तसेच SP Law कॉलेजमधून त्या या बॅचमधील प्रथम क्रमांकावर (College Topper) आल्या बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अली सर,प्रमुख उपस्थिती सहायक आयुक्त समाज कल्याण आयुक्त श्री.शिवानंद मिनगिरे सर व सर्व प्राध्यापक वर्ग,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.











