नांदेड – जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, ०९ जिवंत काडतुसे व एक मोटार सायकल जप्त केली. जप्त मालाची किंमत तब्बल ₹ १,०४,०००/- इतकी आहे.
ही कारवाई दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ००.४० वाजता करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
1️⃣ सय्यद हानिफ सय्यद जाफर (वय २३ वर्षे)
2️⃣ संजय पेंढारे नामदेव (वय ३३ वर्षे)
दोघेही रहिवासी महेदवडगाव, नांदेड.
कारवाईचे मार्गदर्शन मा.श्री. अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक नांदेड,
मा.श्री. सुरज गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक,
मा.श्री. रमेश्वर बंजारे, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांनी केले.
पोलिस निरीक्षक श्री. तिनावर कामेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून अवैध शस्त्रसाठा रोखण्यास मदत होणार आहे.












