नांदेड (दि. 25 सप्टेंबर) :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मा. अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक तैनात करून ही मोहीम हाती घेण्यात आली.
दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण शहरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विविध पथकांनी रात्री उशिरापर्यंत तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेल्या अनेकांवर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली.
पोलिस ठाण्यानुसार कारवाईचा तपशील :
- पोलिस ठाणे भाग्यनगर
- सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकाने दोन पोलिस अंमलदारांच्या सहकार्याने वाजीराबाद चौक, पुणारस, हनुमान चौक परिसरात कारवाई केली.
- एकूण ४ इसम दारू पिऊन शांतता भंग करताना आढळले.
- संबंधितांविरुद्ध कलम 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हे दाखल.
- पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण
- पोलिस अंमलदार एस.डी.ओ 01 यांच्या नेतृत्वाखाली तपासणी.
- एक इसम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आढळला.
- त्याच्यावर देखील कलम 110/117 म. पो. कायद्यानुसार कारवाई.
- पोलिस ठाणे वाजीराबाद
- पोलिस अंमलदारांनी हसरत चौक येथे मोहिम राबवली.
- एक इसम दारू पिऊन शांतता भंग करताना सापडला.
- त्याच्यावर 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हा नोंद.
- पोलिस ठाणे विमानतळ
- सामाजिक न्यायालय कार्यालय, आनंद नगर येथे कारवाई.
- तीन इसम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आढळले.
- सर्वांवर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई.
- दामिनी पथकाची कारवाई
- महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान विशाळ गार्डनजवळ २ इसम दारू पिऊन शांतता भंग करताना पकडले.
- त्यांच्यावर देखील 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हा दाखल.
पोलिस अधीक्षकांचे आवाहन
या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक मा. अबीनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की,
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना अजिबात स्थान दिले जाणार नाही. शहरातील शांती व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशीच धडक कारवाई सुरू राहील. तसेच हॉटेल्स, वाईन शॉप्स व सार्वजनिक ठिकाणांवर सतत तपासण्या केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
👉 या मोहिमेत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शहरात दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.












