नांदेड, दि. १० नोव्हेंबर : माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातून हद्दपार आरोपींवर देखरेख वाढवून व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांकडून विशेष सखोल मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कुंडलवाडी नायगाव तालुक्यातील मटका व जुगार चालवत असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी सय्यद तोफिक उर्फ गोऱ्या सय्यद त्याची नांदेड जिल्ह्यातून आणि लातूर जिल्ह्या तून (पाच महिने) हद्दपार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे संबंधित आरोपीवर चोरी, दंगली व शांतता भंग यासंबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे कुंडलवाडी शहर हद्दीत त्याच्या उपस्थितीमुळे सार्वजनिक शांतता व कायदा राखण्यात अडचण निर्माण होत असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (क) अन्वये कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी नांदेडचे वरिष्ठ अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून तपशीलवार कागदपत्र छाननी करण्यात आली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आरोपीस नांदेड जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात हद्दपार करण्यात आले.
या कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे, गुन्हेगारी गटांचे मनोबल खच्ची करणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे.
संपूर्ण हद्दपार प्रकरणावर मार्गदर्शन नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले असून
कागदपत्रे व आदेशानुसार ही कारवाई कायदेशीररित्या अंमलात आली आहे.












