नांदेड – शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. पोलिस अधीक्षक नांदेड मा. अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलिस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली २० सप्टेंबर २०२५ रोजी “सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक” यांनी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल केले.
कारवाईचे तपशील :
- पोलीस स्टेशन भाग्यनगर परिसर
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत एकात्मिक चौक क्रमांक १ येथे पोलिसांनी कारवाई केली. अशोक नगर, सत्तार वाईन शॉप, कॉटन वाईन शॉप येथे दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध ११०/११७ भा. दं. सं. नुसार कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल व बारवरही तपासणी करण्यात आली. - पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण परिसर
एम.आय.डी.सी. व पटवर्धन चौक येथे तीन जणांवर कारवाई झाली. सार्वजनिक शांतता भंग केल्याने ११०/११७ भा. दं. सं. अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. - पोलीस स्टेशन इतवारा परिसर
जुना मोंढा, मंपटा रोड येथे तीन जणांवर कारवाई करण्यात आली. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले. - पोलीस स्टेशन वजिराबाद परिसर
कर्मवीर वजिराबाद येथे दोन जणांवर कारवाई झाली. सार्वजनिक शांतता भंग केल्याने त्यांच्यावर भा. दं. सं. ११०/११७ अंतर्गत कारवाई झाली. या भागातील दुकाने व हॉटेल्सवरही पोलिसांनी छापे टाकले. - दामिनी पथकाची कारवाई
पेट्रोलिंग दरम्यान दामिनी पथकाने दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षकांचे आवाहन
पोलिस अधीक्षक मा. अबीनाश कुमार यांनी सांगितले की, नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे अजिबात सहन केले जाणार नाही. नागरिकांना सुरक्षित व शांततापूर्ण वातावरण देण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.
👉 या कारवाईमुळे शहरातील वाईन शॉप, बार, हॉटेल्समध्ये देखील तपासणी करून अनेकांना इशारा देण्यात आला आहे.












