नांदेड शहरात अलीकडच्या काळात काही समाजकंटक तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणे, रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देणे, दादागिरी करणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नांदेड श्री. आबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक (गुन्हे) श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली “सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक” ने मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत 06 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी, चौकांमध्ये, बसस्थानक परिसरात व नागरिकांना त्रास होणाऱ्या ठिकाणी पथकाने गस्त घालून दादागिरी करणाऱ्या व संशयित तरुणांवर कारवाई केली.
मोहीमेतील ठळक कारवाई
1) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
- ठिकाण: आयएमएस कॉलेज, विश्रांतीगृह परिसर
- तपासणीदरम्यान:
- रस्त्यावर थांबून गोंधळ घालणारे, येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना त्रास देणारे संशयित तरुण आढळले.
- त्यांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली.
 
2) पोलीस स्टेशन मुदखेड
- ठिकाण: बसस्थानक परिसर, बाजारपेठ
- तपासणीदरम्यान:
- काही तरुण 110/117 कलमान्वये गुन्हेगार असून ते संशयास्पद हालचाली करताना आढळले.
- पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.
 
3) पोलीस स्टेशन विमानतळ
- ठिकाण: हायस्कूल, बाजार परिसर
- तपासणीदरम्यान:
- गोंधळ घालणारे, रस्त्यावर थांबून त्रास देणारे तरुण सापडले.
- त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून इशारा देण्यात आला.
 
महत्त्वाचे उद्दिष्ट
या मोहिमेमागील उद्देश म्हणजे:
- शहरातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे
- महिलांना आणि विद्यार्थ्यांना छेडछाड व त्रासापासून संरक्षण
- समाजकंटक व दादागिरी करणाऱ्यांना वचक बसवणे
पोलिसांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना दिसल्यास किंवा स्वतःला त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, जेणेकरून नांदेड शहरात सुरक्षित वातावरण राहील आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल.












