नांदेड, दि. २ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्यांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घटनेचा तपशील
दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास १०.२० वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव परिसरात सापळा रचला. यादरम्यान, रेती उपसा करणारे हायवा (क्र. MH 26BD 1213) आढळून आले. व त्यावरील चार रेतीच्या बोगद्यांसह एकूण ₹४०,२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची नावे
स्वप्निल दिलीप चौदंते, रा. मुदखेड जि. नांदेड
सचिन कदम, रा. जानापुरी, ता. लोहा जि. नांदेड
गुन्हा क्र. 1043/2025 कलम ३०३(२), ३(५) पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८ (७)(८) नुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मा. श्री. अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड
मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड
मा. श्री. प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, इतवारा
श्री. ओंमकांत चिंचोलकर, पोलिस निरीक्षक, नांदेड ग्रामीण
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस हवालदार वसंत केंद्रे विष्णू कल्याणकर, संतोष पवार मारुती पचलिंग जमीर शेख धम्मपाल कांबळे, यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या कारवाईमुळे नदीपात्रातील अवैध रेती उपसा रोखण्यास मोठा धक्का बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.












