📰
नांदेड, दि. 19 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांवर कठोर अंकुश ठेवण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत स्वप्नील दिलीप चौंदेते (वय 23, रा. नई आबादी, ता. मुदखेड जिल्हा नांदेड या गुन्हेगारावर MPDA (महाराष्ट्र प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम) अंतर्गत कारवाई केली असून त्याला २ वर्षांसाठी कारावासास पाठविण्यात आले आहे.
🔹 कारवाईचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक नांदेड ग्रामीण श्री. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
🔹 महत्त्वाची माहिती
✔ स्वप्नील चौंदे हा दीर्घकाळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती.
✔ चोरी, जबरी चोरी, मारामारी, अवैध कृत्यांमध्ये सहभागी असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली होती.
✔ या सर्व बाबींचा तपशीलवार अहवाल तयार करून MPDA अंतर्गत त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आला.
✔ प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर 18/11/2025 रोजी आदेशानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.
🔹 कारवाईत सहभागी अधिकारी
▪ श्री. ओमकांत चिंचोलकर– पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण
▪ श्री. प्रशांत शिंदे – उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा ps
▪ श्री. उदय खंडेराय– पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड
🔹 पोलीस खात्याची कठोर भूमिका
नांदेड ग्रामीण पोलीस सतत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत असून
▪ 2024–25 या वर्षात 22 गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई
▪ तर संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षात 55 प्रस्ताव, 148 गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कठोर कार्यवाही
🔹 पोलिस अधीक्षकांचा संदेश
“जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोणत्याही किंमतीवर सोडले जाणार नाहीत. नागरिक सुरक्षा हेच प्राधान्य.श्री. अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड.












