नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी पद्मजा सिटी भागातील घरफोडी प्रकरणाची यशस्वी उकल करत तिघा संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 28 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोने, चांदी व दुचाकी असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै ते 14 जुलै 2025 दरम्यान पद्मनगरी येथील एका बंद घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विविध तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी
- शेख मोईन उर्फ गुड्डु शेख बिलाल (वय 46, रा. उमर कॉलनी, देगलूर नाका, नांदेड)
- शेख अजहर उर्फ अजु शेख पिऱ्या (वय 26, रा. घरकुल वर्धन घाट जि नांदेड.
- संदीपकुमार अनिल देवसरकर (वय 47, रा. देवसरी ता. उमरखेड, जि. यवतमाळ)
जप्त मुद्देमाल
- सोने-चांदीचे दागिने – किंमत ₹16,63,000
- रोकड रक्कम – ₹11,37,000
- ब्रेजा क्र. MH-26-BC-8440 – किंमत ₹7,00,000
एकूण मुद्देमाल – ₹35,00,000
ही कारवाई पोलिस अधीक्षक म.अ. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक म.श्री. सुरज गुरव सहाय्यक पोलीस अधीक्षक म.श्रीमती अर्चना पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरीक्षक श्री. उदय खंडेराय उपनिरीक्षक श्री. साईनाथ पुयड पो. नि. श्री. आनंद बिचेवार पो .नि.त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.
नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अलीकडच्या काळात झालेल्या घरफोड्यांचे सत्र थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांचे कौतुक शहरभरातून होत आहे.












