नांदेड दि.८ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे माननीय श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी शहरातील सार्वजनिक शिस्त बिघडवणाऱ्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष “नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी पोलिस पथकांकडून रात्री व पहाटे धडक तपासणी मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशान्वये पथक प्रमुख अ.पो.नि. भागवत नागरगोजे व चार्ली पथकातील अंमलदार यांनी दिनांक ६ व ७ रोजी खालील ठिकाणी कारवाई केली –
१) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण परिसर
एमआयडीसी भागात चार इसम हे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांततेचा भंग करीत असल्याचे पथकास निदर्शनास आले. संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110, 117 अनुसार गुन्हे नोंद. त्याचबरोबर हद्दीतील दारू दुकान, वाईन शॉप, हॉटेलची तपासणी.
२) पोलीस स्टेशन भाग्यनगर परिसर
चार्ली क्रमांक-१ पथकाने किनवट वाईन शॉप परिसरात एक इसम दारू पिऊन गोंधळ घालतानाचे आढळले. त्याच्यावरही कलम 110,117 नुसार कारवाई. परिसरातील दारू दुकानांची पाहणी.
३) पोलीस स्टेशन विमानतळ परिसर
चार्ली क्रमांक-२ पथकाने नमस्कार चौक येथे एक इसम याला दारू प्राशन करून गोंधळ करीत असताना ताब्यात घेतले. त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
४) दामिनी पथक / शिवाजीनगर
बर्फी चौक, यशवंत कॉलेज, फार्मसी कॉलेज परिसरात आठ इसम हे दारू पिऊन आरडाओरडा करत सार्वजनिक शांतता भंग करीत असल्याचे दिसून आले. हे सर्व आरोपी ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कलम 110,117 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले.
माननीय श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नागरिकांना आवाहन केले की –
“सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांनाही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.”
नांदेड शहरातील शांतता, सुरक्षितता व कायदा सुव्यवस्थेसाठी सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पुढेही अशाच ताकदीने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.












