नांदेड – 15 नोव्हेंबर 2025
उमरी शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. 2024–2025 या कालावधीत ‘2+’ गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईत पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची पाऊल उचलत, रऊतीक आमुराय सर्ले उर्फ देशमुख (वय 23, रा. धानोरखुर्द, ता. उमरी) याला MPDA (महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम) अंतर्गत तुरुंगात दाखल केले आहे. जिल्ह्यातील ही ‘2+ स्कीम’ अंतर्गत केलेली 44 वी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगारावर होती सतत गस्त ठेव
नांदेड पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरीसह नांदेड शहर, व भोकर परिसरात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. ऋतिक अमृतराव सर्जे उर्फ देशमुख ता उमरी हा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारा गुन्हेगार असून, चोरी, घरफोडी, वाहनफोड, विनापरवाना शस्त्र बाळगणे, जबरी मारहाण आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग पूर्वीपासून नोंदलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, उमरी पोलिस स्टेशन व नांदेड पोलिसांची माहिती संकलन शाखा यांनी आरोपीच्या हालचालींवर सतत निरीक्षण ठेवून त्याच्या गुन्हायोग्य प्रवृत्तीचे पुरावे जमा केले. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीस अटक करून हरसुल कारागृहात दाखल करण्यात आले.
2024–25 मध्ये 150 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई
नांदेड जिल्ह्यातील गंभीर गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी विशेष मोहिम राबवली असून, या कालावधीत सुमारे 150 पेक्षा अधिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विविध स्तरांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ही 44 वी MPDA कारवाई आहे.
मा श्री पो अधीक्षक अबिनाश कुमार आदेशित व पोलीस उपअधीक्षक श्री अर्चना पाटील श्री पोलीस अप्पर उपाधीक्षक सुरज गुरव व श्री दशरथ पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद नांदेड श्री उदय खंडेराया पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस निरीक्षक श्री नरसिंह अनलदास सहा पो सुरेश भालेराव गंगाधर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, उमरी पोलिस ठाणे, सायबर सेल, भोकर पोलिस पथकांनी समन्वय साधत ही कारवाई यशस्वीपणे केली.












