नांदेड, दि. २८ ऑक्टोबर (प्रतिनिधी): माधव वाघमारे नांदेड पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या इसमावर धडक कारवाई करून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नांदेड पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर पोलिस अधीक्षक श्री. अर्चना पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि श्री उदय खंडेराय, व पो.उप.नि. श्री. वि. रे.ह.घोगरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आदित्य दुर्गा सिंह ठाकूर (वय २० वर्षे, रा. गणेश टॉकीज रोड, लोहारा गल्ली रस्त्या वरील, नांदेड हा तरुण अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस पथकाने ठरवलेल्या ठिकाणी छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून अवैध शस्त्रसाठा मिळून आला. पोलिसांनी शस्त्र व संबंधित साहित्य असा एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३५/२०२५ कलम ४(२५) शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी:
- पोलीस अधीक्षक : मा. श्री. अबिनाश कुमार
- अपर पोलीस अधीक्षक : श्रीमती अर्चना पाटील
- स्थानिक गुन्हे शाखा पो नि श्री उदय खंडेराय
- पो. उप. नि. : वि. रे. ह. घोगरे
- पोलीस अंमलदार : राजू बोदगिरे, संतोष पावडे, विठ्ठल वैद्य गोविंद राठोड महेश बडगु व नांदेड अमलदार राजेंद्र सिटीकर दिपक ओढणे सायबर सेल नांदेड.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “अवैध शस्त्रसाठा, गुटखा, नशाविक्री अशा गुन्ह्यांवर पोलिसांचे लक्ष असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील.”
या कारवाईमुळे नांदेड पोलिसांच्या दक्षतेचा आणि गुन्हे रोखण्याच्या वचनबद्धतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.












