नांदेड – शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम राबवत धडक कारवाई केली. पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून तसेच गस्त वाढवून कारवाई केली.
या मोहिमेत सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकाचा सक्रिय सहभाग राहिला. प्रमुख पोलीस अधिकारी, विभागीय सहाय्यक पोलिस अधीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन करण्यात आले.
कारवाईत खालील प्रमाणे विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली:
🔴 पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण
बडझे कॉर्नर, एम.आय.डी.सी. परिसर येथे एकूण ३ आरोपींवर कारवाई करून कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले. यावेळी हॉटेल्स, वाइन शॉप्स, ढाब्यांवर देखील तपासणी करण्यात आली.
🔴 पोलिस स्टेशन वजिराबाद
कलामंदिर, बसस्थानक परिसर येथे ३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले.
🔴 पोलिस स्टेशन शिवाजीनगर
अलीमिया टॉवर, कुशवाहा समाज, ज्योती टॉकीज रोड परिसर येथील ४ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
🔴 पोलिस स्टेशन भाग्यनगर
पुण्या रोड, अशोकनगर परिसर येथे ७ आरोपींवर कारवाई झाली.
🔴 पोलिस स्टेशन इतवारा
जुना मोंढा परिसर येथे २ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी दारू दुकाने, वाइन शॉप्स, हॉटेल्स यांची तपासणी करून अवैध विक्रीवर देखील नियंत्रण मिळवले.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात तत्काळ कळवावे जेणेकरून योग्य कारवाई करता येईल.












