नांदेड :१२ ऑक्टोंबर (प्रतिनिधी)
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या स्टाफने गोमांस तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १४ जनावरांचे अवैधरीत्या वध व वाहतूक प्रकरण उघडकीस आले असून, पोलिसांनी ₹३,६०,००० किंमतीचे गोमांस जप्त केले आहे.
ही कारवाई १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५.०० वाजता हदगाव रोडवरील सखारामनगर रेल्वे गेटजवळ करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर गोमांसाचा साठा हस्तगत केला.
🧾 प्रकरणाची सविस्तर माहिती :
गुन्हा क्रमांक :
1️⃣ 316/2025 कलम 5, 9, 11(1)(d), 11(1)(e) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 नुसार
2️⃣ 317/2025 कलम 5, 9, 11(1)(d), 11(1)(e) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 नुसार
घटनास्थळ : लक्ष्मी नगर देगलूर नाका, नांदेड
कारवाईची वेळ :
12 ऑक्टोबर 2025, सकाळी 9:15 ते 11:20 दरम्यान
👮 कारवाईत सहभागी अधिकारी :
- मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
- मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक
- मा. श्री. अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी
- मा. श्री. प्रशांत शिंदे, उपविभाग पोलीस अधिकारी इतवारा
तसेच पोलीस निरीक्षक श्री रंजीत भोईटे पोलीस स्टेशन इतवारा श्री संजय शिंदे पोलीस निरीक्षण इतवारा व रमेश गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री गवळी बॅग बंडू कलंदर दासरवाड कोमलवार अफजल पठाण दुरानी इसराइल शेख जावेद जगताप कोरडे पवार गीते टीम, पोलीस हवालदार आणि इतर पथकातील अधिकारी यांनी ही कारवाई यशस्वी केली.
👤 अटक आरोपींची नावे :
1️⃣ शेख आयुब पि शेख मस्तान राहणार इसमालपुरा नांदेड
2️⃣ शेख जाकीर पि शेख फारूक राहणार साईनगर नांदेड
3️⃣ मोहम्मद अक्रम पि मोहम्मद कासिम कुरेशी राहणार रहीम नगर देगलूर नाका नांदेड
💬 पोलीसांचे विधान :
पोलीस अधीक्षक . अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“नांदेड पोलिसांकडून अवैधरित्या गोमांस व्यापारावर सतत देखरेख ठेवली जात आहे. ही कारवाई म्हणजे अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधातील आमचा निर्धार दाखवते. नागरिकांनीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना द्यावी.”
⚖️ जप्त मालमत्ता :
- एकूण १४ जनावरे
- जप्त गोमांस किंमत ₹३,६०,०००/-
ही कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात गोमांस तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.












