नांदेड, दि. 9 डिसेंबर :- (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे ५ वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक मोहीम राबवून १८ लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
🔹 कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, श्रीरामे, रमेश गिरी, मनोज सरपे, महेश जोशी, कल्याणकर, सचिन उपरे, मुंगल, गजानन होळगे, संजय खेडकर आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, जानोळे, हिंगोले यांच्या उपस्थितीत पार पडली.
🔹 जप्त व नष्ट केलेला मुद्देमाल
गस्तीदरम्यान पथकाला उत्खननासाठी वापरली जाणारी
- ३ गुडगुडी
- १ इंजिन
- १५ तराफे
सापडले. मजुरांच्या मदतीने
- ३ गुडगुडी व १ इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट,
- १५ तराफे जाळून नष्ट करण्यात आले.
या सर्वांचा एकूण १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
🔹 अडथळे असूनही पथकाची अॅक्शन
कारवाई रोखण्यासाठी अवैध उत्खनन करणाऱ्यांनी रस्त्यावर मुद्दाम पाणी सोडून चिखल निर्माण केला, ज्यामुळे वाहनांना मार्ग मोकळा नव्हता. तरीही पथकाने ट्रॅक्टरचा वापर करून उत्खनन पॉईंटपर्यंत पोहोचत कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी,
“अवैध रेती उत्खननाविरोधात सातत्याने व कठोर कारवाई सुरूच राहील,”
असा कडक इशारा दिला आहे.












