नांदेड, दि. 30 सप्टेंबर :- पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या अहवालानुसार 28 ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात खून, घरफोडी, जनावर चोरी, शासकीय कामात अडथळा, जुगार तसेच प्रॉबिशन कायद्यान्वये विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –
1) खून – देगलूर
दि. 28 सप्टेंबर रोजी रात्री सुमारास 8.45 वा. शेळगाव नरसिंह ता. देगलूर येथे संतोष परमेश्वर माटलवार (वय 26) याचा त्याचा बहिणीचा सासरा शंकर नरसिंह (वय 35) याने वादातून खून केला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2) घरफोडी
- किनवट : 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते 11.30 वा. दरम्यान कोठारी येथे घरफोडी करून 65,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
- विमानतळ : 27 ते 28 सप्टेंबर दरम्यान चैतन्य नगर नांदेड येथे घरफोडी करून 58,400/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
3) जनावर चोरी -मुक्रमबाद
दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री 7.00 ते 9.30 वा. मुक्काबाब येथे शेतातून एक बैल (किंमत 60,000/- रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरी केला.
4) शासकीय कामात अडथळा – माहूर
दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वा. माहूर येथे पोलिसांच्या पथकाला अडथळा निर्माण करून सरकारी कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी अर्जुन प्रकाश पवार (वय 19) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
5) जुगार – हदगाव
दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वा. हनुमान मंदिराजवळील परिसरात चार व्यक्तींवर (गणेश नवाळे, सुमन राठोड, नागनाथ गिरडंळे व इस्माईल नागनाथ) जुगार खेळताना रंगेहाथ कारवाई करण्यात आली. त्यांच्या जवळून 6,250/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
6) प्रॉबिशन कायद्यांतर्गत कारवाई
- मांडवी : 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. मांडवी येथे भाऊराव गोरोबा राठोड (वय 20) हा दारूच्या अड्ड्यावर विक्री करताना पकडला गेला. त्याच्याकडून 5000/- रुपये किंमतीची दारू जप्त.
- कंधार : 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वा. आणि विजयवाडी, कंधार येथे सुधीर पंडित मोरे (वय 37) हा देशी दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडून 3840/- रुपये किंमतीची दारू जप्त.
👉 वरील सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.












