मुंबई, दि. ८ ऑक्टोबर – ‘सायरा खान केस’ हा आगामी चित्रपट कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट केस स्टडी म्हणून समोर येत आहे. वैयक्तिक कायदा, धर्मनिरपेक्ष कायदा, विवाह, घटस्फोट, मुलांचा ताबा आणि महिलांच्या अधिकारांशी संबंधित विविध कायदेशीर पैलू या चित्रपटात प्रभावीपणे मांडले गेले आहेत.
हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून, तो शिक्षणात्मक दृष्टिकोनातून समाजाला आणि विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवा विचार देणारा आहे. ‘सायरा खान केस’ मधून न्यायव्यवस्था, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायद्याच्या कलमांचा वास्तविक जीवनातील उपयोग यांचा अभ्यास करण्याची एक अनोखी संधी मिळते.
चित्रपटातील प्रमुख भूमिका अभिनेत्री सायरा खान यांनी साकारली असून, एका स्त्रीने अन्यायाविरुद्ध उभे राहत न्याय मिळवण्यासाठी केलेला संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. दिग्दर्शकांनी सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर वास्तव यांचा सुंदर समतोल साधत कथेला न्याय दिला आहे.
कायद्याचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि न्यायविषयक क्षेत्रात रस असणाऱ्या सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे आवाहन शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
‘सायरा खान केस’ हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
हा चित्रपट समाजात कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणारा आणि स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देणारा ठरणार आहे.












