नांदेड, दि. ७ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (फेब्रुवारी-मार्च 2026) परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नियमित विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID द्वारे ऑनलाईन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत सादर करावीत. तसेच पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थी, तुरळक विषय घेणारे विद्यार्थी तसेच आयटीआय प्रशिक्षणार्थी (Transfer of Credit घेणारे) विद्यार्थी यांनी अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावेत. या सर्वांसाठी देखील अर्ज सादर करण्याची मुदत 7 ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे जमा करावे. शुल्क भरल्यानंतर Application Status मध्ये “Draft to Send to Board” आणि Payment Status मध्ये “Paid” असा बदल झाला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. शुल्कासह चलन, विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करण्याच्या तारखा नंतर कळविण्यात येतील, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षक यांची योग्य माहिती भरून ती मंडळाकडे पाठवावी. सर्व अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिलिस्ट शाळांच्या लॉगिनमधून डाउनलोड करून विद्यार्थ्यांकडून माहितीची पडताळणी करून स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर मुख्याध्यापकांनी प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
नियमित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जांसाठी UDISE + मधील अद्ययावत PEN-ID नोंद आवश्यक आहे. तर UDISE + मध्ये नोंद नसलेल्या पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने अर्ज भरावेत. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे, ती माहिती आवेदनपत्रात नमूद करणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचे व त्रुटी टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
👉 प्रमुख मुद्दे:
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 27 ऑक्टोबर 2025
- अर्ज भरण्याची पद्धत: शाळेमार्फत ऑनलाईन
- संकेतस्थळ: www.mahahsscboard.in
- शुल्क भरण्याची पद्धत: RTGS/NEFT
- संपर्क: संबंधित शाळांचे मुख्याध्यापक
आपण इच्छित











