नांदेड :
सन 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षात( Ph.d) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बार्टी, सारथी, महाज्योती अमृत, आर्टीं संस्थेमार्फत महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे विद्यार्थी शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तक खरेदी आदी शैक्षणिक बाबतीत अडचणीत सापडले आहेत.
राज्यातील सर्वच शासकीय योजनांमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र गेल्या दोन शैक्षणिक वर्षांपासून या विद्यार्थ्यांना शासनाने कोणतीही मदत केलेली नाही. परिणामी शेकडो विद्यार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 मधील शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांच्या राज्य समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे.
समितीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदनाद्वारे हा प्रश्न मांडला आहे. शासनाकडून वेळेत शिष्यवृत्ती न दिल्यास विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर आर्टीं, सारथी, महाज्योती अमृत, व इतर भागातील एकूण 20 पेक्षा अधिक पदवी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
👉 महत्वाची मागणी:
- सन 2022-23 आणि 2023-24 शैक्षणिक वर्षाची थकलेली शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी.
- सर्व संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत समान न्याय द्यावा.
- अन्यथा विद्यार्थ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल.
✍️ विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देणारे विद्यार्थी नेते व (30) संशोधक विद्यार्थी यांनी सही करून यावेळी शासनाकडे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.











