नांदेड, दि. १२ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील विमानतळ, शिवाजीनगर व हदगाव परिसरात मोटरसायकलवरून जबरी चोरी व नचिंक करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. या कारवाईत एकूण ₹३,०८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई माननीय श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, आणि माननीय श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यवाही श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक साईनाथ, तसेच पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद नरबाक, प्रमोद जोंधळे, शेख इब्राहिम, संदीप घोगरे, बालाजी कदम, अमोल घेवारे, संतोष बेलूरोड, अनिल बिरादार, महेश बडगु, आणि सायबर सेल नांदेडचे पोलीस कॉन्स्टेबल राजू सिटीकर, दीपक ओढणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
🕵️♂️ आरोपींची माहिती :
- शेख सोहेल उर्फ सहील शेख रहीम (वय 23) – व्यवसाय मिस्त्री, रा. महबूबनगर, नांदेड
- शेख सलीम उर्फ सलीम कुत्रा शेख रजाक (वय 24) – व्यवसाय मजुरी, रा. फारूकनगर, नांदेड
- शेख एजाज शेख अहमद (वय 23) – व्यवसाय मिस्त्री, रा. नुरी चौक, नांदेड
🔍 कारवाईचे तपशील :
दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
तीन इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून सोन्याचे दागिने विक्रीसाठी शंकरराव चव्हाण चौक ते वाजेगाव रोडवरील माता-पाका कोर गुरुद्वारा समोर थांबले आहेत.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून संशयितांना पकडले. चौकशीत त्यांनी जबरी चोरीच्या घटनांची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेला माल व मोटरसायकल असा एकूण ₹३,०८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई “ऑपरेशन गुन्हेगारीवर आळा” या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील मालमत्ताविरुद्ध गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक यशस्वी पाऊल उचलले आहे.
👉 नांदेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली अथवा गुन्हेगारी प्रवृत्ती दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.











