नांदेड, दि. १५ ऑक्टोबर : भाग्यनगर पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून नांदेड पोलिसांनी तिन मोटारसायक लींसह एकूण सुमारे ७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांवर लगाम बसण्याची शक्यता आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५४७/२०२५ कलम ३०३(२) भा.दं.वि. नुसार तक्रारदार महेश मारोतराव बलोरे रा. गणेशवाडी ता.पालम, जि. परभणी यांचा मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचप्रमाणे वजीराबाद पोलिस ठाण्यातही गु.र.नं. ४२४/२०२५ कलम ३०३(२) भा.दं.वि. अंतर्गत राजकुमार संभाजी गडंबे रा. सोमेश कॉलनी यांचा वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासादरम्यान नांदेड पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मा. श्रीअर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव व पोलीस उपअधीक्षक नांदेड शहर रामेश्वर व्यंजने यांच्या देखरेखीखाली गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, उपनिरीक्षक महेश माळी, उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व त्यांची पथक यांनी संशयित आरोपींवर नजर ठेवून संशयित गणेश ऊर्फ चुहा बालाजी हिंगोले (वय १९ वर्षे, रा. देगावचाळ, नांदेड) या आरोपीस अटक केली. चौकशीअंती आरोपीकडून खालील तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या
1️⃣ बजाज पल्सर मोटारसायकल (MH-22 AY-5522) — किंमत ₹30,000/-
2️⃣ हिरो कंपनीची पैशन प्रो मोटारसायकल (MH-26 U-3345) — किंमत ₹20,000/-
3️⃣ हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (MH-26 W-238) — किंमत ₹20,000/-
अशा प्रकारे एकूण ₹70,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण घडले आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून इतर गुन्ह्यांचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून भवानीनगर व वजीराबाद पोलिस ठाण्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.












