नांदेड, 28 सप्टेंबर :
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 ते 5:00 वाजेपर्यंत नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नवीन मोंढा – अण्णाभाऊ साठे चौक – चिखलवाडी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जाणार आहे. त्यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.
बंद असलेले मार्ग :
- वसंतराव नाईक चौक ते अण्णाभाऊ साठे चौक
- हिंगोली गेट अंडरब्रिज व ओव्हरब्रिज ते चिखलवाडी चौक, महावीर चौक मार्ग
- शंकराव चव्हाण पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक
- रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चिखलवाडी मार्गे जुना मोंढा मार्ग
- वजीराबाद चौक ते शिवाजी पुतळा
पर्यायी मार्ग :
- वसंतराव नाईक चौक → महाराणा प्रताप चौक → बाफना टी पॉइंट → आयटीआय → व्हीआयपी रोड
- शंकराव चव्हाण पुतळा → भाभानगर → रबडी पॉइंट → आनंदनगर चौक
- रेल्वे स्टेशन → वजीराबाद चौक → तरोडेकर मार्केट → तिरंगा चौक → सोनू कॉर्नर → महावीर चौक → गुरुद्वारा चौक → पुणे वाहतूक मार्ग
या काळात नागरिकांनी आपल्या प्रवासाची योग्य ती आखणी करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
👉 नांदेड करांनो, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत वाहतूक मार्ग बदल लागू राहणार आहे.












