वाहतुकीत बदल – ६ ऑक्टोबर रोजी
नांदेड (प्रतिनिधी):
नांदेड शहरात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी (सोमवार) सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या वेळेत आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित ‘ST आरक्षण बचाव व मागणी मोर्चा’ मुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. या मोर्चामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून, पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही माहिती नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला असून, मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
मोर्चाची सुरुवात शिवाजी महाराज चौक, नांदेड येथून होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियोजनासाठी खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत:
🚫 वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग:
- वसंतराव नाईक चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट–अंडरब्रिज–ऑक्टोबर ब्रिज–शिवाजी महाराज चौक–महावीर चौक पर्यंत जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहील.
- शंकररावजी चव्हाण चा पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जाणारी वाहने पूर्णपणे बंद राहतील.
- रेल्वे स्टेशन ते जुना मोंढा–शिवाजी महाराज चौक–जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- वजीराबाद चौकातून शिवाजी पुतळ्याकडे जाणारी वाहतूक देखील बंद राहील.
🚗 वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
- वसंतराव नाईक चौकातून हिंगोली गेटकडे जाणारी वाहने चिखलवाडी कॉर्नर, रेल्वे स्टेशन रोडमार्गे जुना मोंढा मार्गे जाऊ शकतील.
- आ टी आय मार्गे VIP रोडने जाणारी वाहने –शंकराव चव्हाण चा पुतळा बाबा नगर रबडी पॉईंट आनंद नगर मार्गे वळविण्यात येतील.
- रेल्वे स्टेशन ते जुना मोंढा जाणारी वाहने – वजीराबाद चौक–तरोडेकर मार्केट (रॉंग साईड) किंवा तिरंगा चौक–सोनू कॉर्नर–महावीर चौक–गुरुद्वारा चौक या मार्गाने वळविण्यात येतील.
या बदलांचा कालावधी ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत लागू राहील. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
📍 सूत्र: पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
📆 दिनांक: ०५ ऑक्टोबर २०२५
✍️ स्वाक्षरी: अबिनाश कुमार, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, नांदेड












