नांदेड दि. २२ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
नांदेड शहरातील नांदेड वाईन शॉप शिवाजी पुतळा खंडणीसाठी मारामारी करणाऱ्या दोन आरोपींना वजीराबाद पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून न्यायालयात हजर केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपींना गजाआड करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
घटना तपशील
दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी रितेश अमृतप्रसाद जयस्वाल (वय ३५, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. आयोध्या नगर नांदेड) हे आपल्या नांदेड वाईन शॉप मध्ये नेहमी प्रमाणे बसत होते त्यांच्या वाईन शॉप मध्ये काम करणारे संदीप विठ्ठल रेणके विनोद ठाकूर नंदकुमार मद्रेवार आनंद खंदारे असे दुकानात काम करत असताना दोन अनोळखी सरदारजी आले वाईन शॉप वरून एक दारूचा खंबा घेतला दुकानात काम करत असलेल्या व्यक्तींनी त्याला पैसे मागितले पैसे नाही देते सम जा तुमको हार महिना मुझे दस हजार रुपये हप्ता देना पडेगा असे म्हणत दुकानात घुसून दारूच्या बाटल्या फोडल्या दारूच्या खंबा घेऊन फिर्यादी रितेश जयस्वाल ला डोक्यात दारूचा खंबा मारून जखमी केले .
पोलिसांची कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव विभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वेजणे यांच्या देखरेखीखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
CCTV फूटेज, तांत्रिक साहाय्य तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संशयित आरोपींना अटक केली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
आरोपीचे नाव
1 परमजीत सिंघ पि दर्शन सिंघ सिंधू वय 21 वर्ष रा. गोविंद कॉलनी सिडको नांदेड व्य. बेकार
2 सतपाल सिघ पि बालासिंघ धारिवाल वय 25 वर्षं रा. गुरुद्वारा गेट नंबर 3 नांदेड व्य. बेकार
दोन्ही आरोपींवर कलम 115 (2), 118 (1), 309 (6), 308(2), 324, 324(6), 352, ३५ (१), भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल असून, पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे.
पोलिसांचा गौरव
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. अबीनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्री. परमेश्वर कदम वजीराबाद पोलीस ठाणे नांदेड श्री. राजू वटाणे सहा. पोलीस निरीक्षक बालाजी किरवले वजीराबाद पोलीस ठाणे नांदेड हेडकॉन्स्टेबल हबीब चाऊस शिव साहब मडपती ज्वालासिंग बावरी विलास कदम गणेश धुमाळ संतोष पोकले रमेश सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली. वेळीच कारवाई करून नागरिकांचा विश्वास जपल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
👉 नांदेड पोलिसांचे आवाहन आहे की, नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून आरोपींवर जलद कारवाई करता येईल.












