नांदेड दि. 2 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : नांदेड पोलिसांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध घटनांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. त्यात साठी दु:खांत, प्राणी संरक्षण कायदा उल्लंघन, सार्वजनिक उपद्रव व जुगार प्रकरणांचा समावेश आहे.
दु:खांत प्रकरण (पोलीस स्टेशन ग्रामीण)
३० सप्टेंबर रोजी सायं. ४.३० वा. साईबाबा नगर, असवधन नांदेड येथे अपघातात २ वर्षांचा चिमुकला घरासमोर खेळत असताना टेम्पोच्या धडकेत मृत्युमुखी पडला. या प्रकरणी चालक शिला हरिशचंद्र झोडगे (वय २७, रा. साईबाबा नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राणी संरक्षण कायदा उल्लंघन (भाग्यनगर पोलीस स्टेशन)
३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता मिल्कत टू कर्नल रोडवर पोलिसांनी छापा टाकून आरोपी सोहेल शेख रफीक (वय २५) यासह दोन जणांना पकडले. त्यांच्याकडून कत्तल केलेले गोमांस जप्त करण्यात आले असून, ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक उपद्रव (लोहा पोलीस स्टेशन)
२७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता (ता. लोहा) येथे आरोपी मल्लिकार्जुन मटकरे (वय ५४) यांनी फेसबुकवर द्वेषपूर्ण फोटो टाकून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोहरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुगार प्रकरण (विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत)
१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.४५ वा. सचखंड नगर परिसरात पोलीसांनी छापा टाकून सागर सिंग परमसार (वय २८) याच्यासह तिघांना जुगार खेळताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १७,००० रुपये आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड पोलिसांकडून सर्व प्रकरणी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.












