नांदेड :
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार व मा. श्री. आबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड (IPS) यांच्या आदेशानुसार, नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर, कंधार परिसरात अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली.
दिनांक 09.09.2025 रोजी सायंकाळी ५.५० वा. सुमारास उस्माननगर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीदरम्यान गोळेवाडी शिवार येथील पैनगंगा नदी पात्रात गेले असता चार हायवा गाड्या रेती भरून नदीतून बाहेर काढताना दिसल्या. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण चार हायवा गाड्या, दोन पोकलॅन मशिन व १० युनिट रेती असा सुमारे १,००,००,०००/- (एक कोटी रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्ह्याची नोंद
पोलिस ठाणे : उस्माननगर
गुन्हा क्रमांक : 237/2025
कलम : भादंवि कलम 302(2), 3(5) BNS-2023, तसेच कलम 4, 21 पर्यावरण संरक्षण अधिनियम, कलम 48, 7(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
आरोपींची नावे
- शंकर प्रकाश भर्कडे, रा. कोढेगाव ता. कंधार
- संतोश ज्ञानेश्वर भर्कडे, रा. कोढेगाव ता. कंधार
- इंद्रज शेषेराव जाधव, रा. पिंपळगाव
- भगवान पंडित भोई, रा. सालवाडा ता. लोहा जि. नांदेड
महत्त्वाची पोलिस पथके व अधिकारी
या यशस्वी कारवाईसाठी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले :
- मा. श्री. आबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड (IPS)
- मा. श्री. संजय गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड
- मा. श्रीमती मीनाक्षी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर
- मा. श्रीमती डॉ. योगिनी जगताप, पोलीस उप-अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा
सक्रिय पथक :
श्री. संदीप निवळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक
श्री. गोवर्धन गोव्हाळे, पोलीस नाईक
संपूर्ण उस्माननगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी
पोलीस अधीक्षकांचे कौतुक
मा. श्री. आबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सांगितले की, “नदी पात्रातून होणारे अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल हा आतापर्यंतचा मोठा यशस्वी टप्पा आहे.












