नांदेड, दि. ७ ऑक्टोबर :
पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विविध गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून त्यावर स्थानिक पोलिसांनी जलद गतीने कारवाई सुरू केली आहे. चोरी, अवैध वाळू उपसा, दुचाकी चोरी, मारहाण तसेच प्रोहिबिशन गुन्हे यांचा यात समावेश आहे.
१) चोरीच्या घटना :
नांदेड ग्रामीण :
१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०० ते ३ ऑक्टोबर सकाळी ११.०० या वेळेत निरंजन कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू व रोख रक्कम लंपास केली. फिर्यादीच्या माधव दादाराव देवसरकर तक्रारीवरून इमामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
किनवट
२९ ते ३० सप्टेंबरदरम्यान श्री. अरविंद माधवराव सूर्यवंशी रा. दर सांगवी यांच्या शेतातून सोलार वायर मोटार असा ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी ४२ वर्षीय आरोपी शेख हसन शेख पिंटू राहणार चिखली (बु) ता.किनवट याला अटक करण्यात आली आहे.
२) मोटारसायकल चोरी :
लिंबगाव :
२ ऑक्टोबर रात्री १० वाजल्यापासून ३ ऑक्टोबर सकाळपर्यंत फिर्यादीच्या घरासमोर उभी केलेली हिरो होंडा मोटारसायकल (एम.एच. २६-बीएल-८७२८) चोरीस गेली. पोलीस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
३) अवैध वाळू चोरी :
सोनेखेड :
६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता पोलिसांनी कारवाई करून एका टिपर वाहनातून २५ हजार रुपयांची वाळू जप्त केली. आरोपी रामचंद्र खुशालराव गायवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४) गंभीर दुखापत :
नांदेड ग्रामीण :
५ ऑक्टोबर रोजी सकाळी वादातून वसरणीत मीझालेल्या हाणामारीत एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्याम कचरू भिसे आरोपींविरुद्ध कलम ३५१, ३५२, ३५५, ३५७ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
५) मारहाणीच्या घटना :
समशेरपूर व बिलोली परिसरात दोन वेगवेगळ्या हाणामारीच्या घटना घडल्या.
पहिल्या घटनेत ३६ वर्षीय शेतमजूरास मारहाण झाली तर दुसऱ्या घटनेत दोन आरोपींनी शेतातील वादातून एका व्यक्तीला दुखापत केली. दोन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.
६) गैरकायद्याची मंडळी :
माहूर :
५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता राहणार्या घरात काही व्यक्तींनी एकत्र येऊन गावात दहशत निर्माण केल्याप्रकरणी १४ आरोपींवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७) प्रोहिबिशन कारवाई :
कुंडलवाडी :
६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी छापा टाकून एका महिलेच्या दुकानातून देशी दारूचा साठा जप्त केला. आरोपी सुमनबाई भगवान कदम (वय ५२) हिला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
ह्या अहवालानुसार नांदेड जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यांवर तत्परतेने कारवाई करून आरोपींचा शोध सुरू ठेवला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत त्वरित स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आदेशित केले आहे












