नांदेड, दि. 24 सप्टेंबर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विविध गुन्हे घडले असून त्यात घरफोडी, अॅटो चोरी, फसवणूक, जुगार, तसेच गळफास घेऊन आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
घरफोडी
देगलूर :
दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादी वसाहतीत राहतात त्या घरात अज्ञात चोरट्याने पाठीमागील लोडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून 50,000/- रुपये चोरले. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑटो चोरी
उस्माननगर :
दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 4 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीचा ‘रिक्षा अॅटो’ (एमएच 26 बीजी 6267) किंमत 90,000/- रुपये असा पळवून नेला. याबाबत उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक
नांदेड ग्रामीण :
दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वा. च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बनावट कंपनीच्या नावाखालील व्यवसायातून लोकांना 51,52,683/- रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुगार प्रकरणे
1) भाग्यनगर :
दि. 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून 1840/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
2) बिलोली :
दि. 23 सप्टेंबर रोजी सायं. 7.15 वा. च्या सुमारास तालुक्यातील रमणप्पा बिलोली येथे 25,850/- रुपये मुद्देमालासह अकरा आरोपींना जुगार खेळताना पकडण्यात आले.
3) विमानतळ :
दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4.45 वा. हडोळा शिवारातील शेतात छापा टाकून 1,550/- रुपये मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल.
गळफास घेऊन आत्महत्या
रामतीर्थ :
दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. रामतीर्थ येथे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 28 वर्षीय युवकाने आत्महत्या केली.
वरील सर्व घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यांत करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.












