नांदेड – पूर्णा प्रकल्पात आलेल्या मोठ्या पाणलोटामुळे येलदरी सिद्धेश्वर धरणातील साठा झपाट्याने वाढला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, पूर्णा पाटबंधारे विभाग, यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पूर्णा धरणातून 32,180 क्युसेक (911 घनमीटर) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सायंकाळी 8 वाजेपर्यंत हा विसर्ग 25,683 क्युसेक (725.98 घनमीटर) वर पोहोचला आहे.
दरम्यान, सततचा पाऊस व वाढता पाणलोट लक्षात घेता धरणात आणखी पाण्याची आवक होत आहे. यामुळे परभणी जिल्ह्यात जिंतूर सेनगाव धरणाचे पाणी फुलवून जाणार ची शक्यता आहे औंढा जिंतूर रोड वर फुलावरून पाणी जाण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाने पुढील तासांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग 44,750 क्युसेक (1267.16 घनमीटर) पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पूर्णा नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी व गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पिके, जनावरे व शेतीसाठीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही सांगण्यात आले आहे.
पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
पूर्णा-गोदावरी संगम परिसरासह नांदेड शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून, नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
जनतेला आवाहन
पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीपात्र व पूलाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉 एकूणच, धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत.












