📰
नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि. 01 ऑक्टोबर 2025) रोजी रात्री छापा टाकून एका रॉयल्स स्टे लॉज वर भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने अचानक धाड टाकून लॉज कारवाई केली.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व पो.उपनिरीक्षक श्री सुरज गुरव वा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटक आरोपी
➡️ साहिल सुद्योधन इंगोले वय 21 वर्षे, रा. गोकुळ नगर, नांदेड
घटना तपशील
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रॉयल स्टे लॉज, मालेगाव रोड, नांदेड येथे छापा मारला असता तेथे संशयित आरोपी साहिल सुद्योधन इंगोले हा लॉजमध्ये ग्राहकांची ओळखपत्राची पूर्तिता न केल्याने व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर भाग्यनगर पोलीस सानी कारवाई केली आहे.
या कारवाईत आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक नरेश वाडेवाले करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी या कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.
👉 ही कारवाई यशस्वी होण्यासाठी पो.निरीक्षक संतोष तांबे, पो.निरीक्षक महेश माढे, तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.












