नांदेड, दि. ५ ऑक्टोबर —समता नगर महामाया बुद्ध विहार येथे आजपासून दर रविवारी बुद्ध वंदना घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजक राहुल केवळाबाई हरी एडके असून, त्यांनी समाजात बौद्ध धम्माच्या शिकवणींचा प्रसार व जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची माहिती दिली.
बुद्ध वंदनेदरम्यान त्रिशरण पंचशील, धम्मपठण, बुद्ध वंदना, ध्यान साधना आणि धम्म प्रवचनाचा समावेश असेल. या माध्यमातून समाजातील बांधवांमध्ये बंधुभाव, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश पोहोचविण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले.
दर रविवारी सकाळी ९:३० वेळी ही वंदना घेण्यात येणार असून, सर्व बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक राहुल एडके यांनी केले आहे. वंदना झाल्यानंतर लहान बालकांना बिस्किट वाटप करण्यात आलेले आहे तरी समता नगर नागरिकांनी दर रविवारी सायंकाळी ठराविक वेळे ही वंदना घेण्यात येणार असून तरी सर्व बौद्ध बांधवांनी भगिनींनी उपस्थित राहावे..












