aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

Aawaz Times by Aawaz Times
February 24, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी, माधव वाघमारे

नांदेड, दि. २४ फेब्रुवारी: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठ्या रेल्वे अपघातांना आळा बसला असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना महाव्यवस्थापक स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ (महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी) सुरक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिकंदराबाद येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सोहळ्यात दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजय कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि झोनमधील इतर विभागप्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला.

जानेवारी २०२६ महिन्यासाठी जाहीर झालेल्या या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ऑपरेटिंग विभागातील पॉइंट्समन तसेच अभियांत्रिकी विभागातील दोन ट्रॅक मेंटेनर यांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीचा तपशील खालीलप्रमाणे:

१. श्री दिलराज मीणा (पॉइंट्समन, बोल्डा): दिनांक २० जानेवारी रोजी बोल्डा स्थानकावर गाडी क्र. 17642 एक्सप्रेस सुटण्याच्या प्रतीक्षेत असताना श्री मीणा यांनी कोच क्रमांक B-2 जवळ एक भाग लोंबकळत असल्याचे पाहिले. तातडीने तपासणी केली असता आर्म बॉटम कव्हरचे बोल्ट निघून गेल्याने पुढील ट्रॉली लोंबकळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित वरिष्ठांना याची माहिती दिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

२. श्री इंगोले अमोल (ट्रॅक मेंटेनर-III, बोल्डा): दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी बोल्डा-सिरली दरम्यान ओएचई पोल क्र. ९०१/१५-१६ जवळ फिरत असताना त्यांना एफबी वेल्ड फेल्युअर (रुळाची वेल्ड तुटल्याचे) आढळून आले. त्यांनी चोख कामगिरी करत तात्काळ लाकडी ब्लॉक देऊन, सैल फिटिंग्ज घट्ट करून आणि आपत्कालीन क्लॅम्प बसवून ट्रॅकचे संरक्षण केले. अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

३. श्री सुरेश मस्के (ट्रॅक मेंटेनर-II, बसमत): दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी बसमत-माळसेलू दरम्यान पहाटेच्या वेळी फिरत असताना त्यांनीही अशाच प्रकारचे एफबी वेल्ड फेल्युअर शोधून काढले. त्यांनी तातडीने लाकडी ब्लॉक देऊन ट्रॅकचे संरक्षण केले व सैल फिटिंग्ज घट्ट करून गंभीर सुरक्षाधोका टाळला.

महाव्यवस्थापक श्री संजय कुमार श्रीवास्तव यांनी या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या समर्पण, दक्षता आणि प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. अशा कार्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सुरक्षेची मजबूत संस्कृती निर्माण होण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.

नांदेड विभागाच्या वतीने या तिन्ही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी इतर सहकाऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

Next Post

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved