aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home कृषी

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

Aawaz Times by Aawaz Times
February 24, 2026
in कृषी
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. २४ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे 

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकारच्या राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. पांडे यांनी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, जलसंधारण, सिंचन, उद्योग, नाबार्ड, अग्रणी बँक आदी सर्वच विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यंत्रसामुग्रीचा अभिप्राय घेण्याच्या सूचना

डॉ. पांडे यांनी कृषी विभागाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीचा नियमित अभिप्राय घेण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप्स सारख्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी सुचवले. कृषी विभागाने तयार केलेल्या जिल्हा आराखड्यात आवश्यक त्या सुधारणा करून उद्दिष्टपूर्तीला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विविध विभागांच्या कामगिरीचा लेखाजोखा

बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शेतीत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर, चिया व मका लागवडीस प्रोत्साहन, एक लाख जलतारा उद्दिष्ट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, फार्मर कपतर्फे 550 शेतकऱ्यांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण, महाडीबीटी अंतर्गत लाभ वितरण आणि यांत्रिकीकरण या मुद्द्यांचा समावेश होता.

याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण मोहिमा आणि दूध उत्पादनवाढीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. रेशीम विभागाच्या महारेशीम अभियानाची उद्दिष्टपूर्ती आणि रेशीम शेतीच्या फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाने शेततळे निर्मिती व मत्स्यपालनात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. जिल्हा जलसंधारण, सिंचन, कापूस संशोधन केंद्र, ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा उद्योग केंद्र यांनीही आपल्या योजनांचा आढावा सादर केला.

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे काम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्रात विशेष प्रगती होत असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

धनगरवाडी येथे रेशीम शेतीची पाहणी

बैठकीपूर्वी, डॉ. निधी पांडे यांनी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील रेशीम शेतीच्या क्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून रेशीम उत्पादनाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतली. प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी देण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचीही त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

Next Post

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

अतिवृष्टीने कोलमडलेल्या बळीराजाला धीर
कृषी

अतिवृष्टीने कोलमडलेल्या बळीराजाला धीर

September 13, 2026
ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कृषी

ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

September 4, 2026
कृषी

माळेगाव यात्रेत सव्वा कोटींचा ‘उस्मानाबादी बोकड’ आकर्षणाचा केंद्रबिंदू

December 19, 2025
कृषी

नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत 25 बिबटे आढळल्याची माहिती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

December 13, 2025
Uncategorized

गहू पेरणीच्या हंगामात बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या शेतीकामावर धोक्याचे सावट

December 11, 2025
कृषी

🌾 शेतकऱ्यांनी घ्यावा ‘फळ पिक विमा योजने’चा लाभ : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

October 13, 2025
Next Post

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved