aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home कृषी

माळेगाव यात्रेत सव्वा कोटींचा ‘उस्मानाबादी बोकड’ आकर्षणाचा केंद्रबिंदू

Aawaz Times by Aawaz Times
December 19, 2025
in कृषी
0
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


श्रीक्षेत्र माळेगाव  दि. 19 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे माळेगाव यात्रेत दरवर्षी पशु-पक्षी स्पर्धा तसेच खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेत तब्बल सव्वा कोटी रुपये किंमत असलेला उस्मानाबादी जातीचा बोकड भाविक व व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी येथील रमाकांत यादवकळे यांनी हा देखणा बोकड विक्रीसाठी माळेगाव यात्रेत आणला आहे. पूर्णतः आकर्षक काळ्या रंगाचा हा बोकड असून, त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात नैसर्गिकरीत्या उर्दूमध्ये ‘अल्लाह’ असे लिहिल्यासारखे चिन्ह दिसत असल्याची माहिती मालकांनी दिली. या वैशिष्ट्यामुळे हा बोकड यात्रेत चर्चेचा विषय ठरला आहे.

या बोकडाला पाहण्यासाठी यात्रेत आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होत असून, आतापर्यंत २५ लाख रुपयांपर्यंतची मागणी आल्याचे सांगण्यात येते. मात्र, मालक रमाकांत यादवकळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, सव्वा कोटी रुपये किंमत मिळाल्याशिवाय हा बोकड विकला जाणार नाही.

माळेगाव यात्रा पशुव्यापारासाठी प्रसिद्ध असली तरी, इतक्या मोठ्या किमतीचा बोकड प्रथमच यात्रेत दाखल झाल्याने भाविक, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बोकडाच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, त्याला शेंगदाणा पेंड, सोयाबीन, गहू यांसारखे पौष्टिक खाद्य दिले जाते.

बोकडाच्या विक्रीसाठी विशेष बॅनरद्वारे जाहिरात करण्यात येणार असून, त्याच्या देखण्या रूपामुळे व दुर्मिळ वैशिष्ट्यांमुळे तो माळेगाव यात्रेतील खास आकर्षण ठरत आहे. सध्या बोकड पाहण्यासाठी यात्रास्थळी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले

Next Post

31 डिसेंबरपूर्वी शस्त्र परवाना नुतनीकरण करा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

February 24, 2026
कृषी

नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत 25 बिबटे आढळल्याची माहिती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

December 13, 2025
Uncategorized

गहू पेरणीच्या हंगामात बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या शेतीकामावर धोक्याचे सावट

December 11, 2025
कृषी

🌾 शेतकऱ्यांनी घ्यावा ‘फळ पिक विमा योजने’चा लाभ : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

October 13, 2025
कृषी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर

October 7, 2025
कृषी

ढोकी येथे तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थीत पीक कापणी प्रयोग संपन्न

October 3, 2025
Next Post

31 डिसेंबरपूर्वी शस्त्र परवाना नुतनीकरण करा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved