नांदेड, दि. 30 ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत ईसापुर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता आणखी 2 गेट प्रत्येकी 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून एकूण 5 वक्रद्वारे प्रत्येकी 0.50 मीटरने पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे पेनगंगा नदीपात्रात एकूण 8541 क्युसेक्स (241.859 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक आणि हवामानाच्या स्थितीचा विचार करून विसर्गात वाढ किंवा घट करण्याचा निर्णय पुढील काही तासांत घेतला जाणार आहे.
तसेच प्रशासनाकडून नदीकाठावरील व पुराच्या धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: ईसापुर, किनवट, हदगाव, हिमायतनगर परिसरातील गावांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस दल आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
धरण विसर्ग – 8541 क्युसेक्स (241.859 क्युमेक्स)
एकूण उघडलेले गेट – 5 (प्रत्येकी 0.50 मीटर) तारीख 30 ऑक्टोबर 2025, सकाळी 6.00 वा.
सावधानता बाळगा, सुरक्षित राहा












