नांदेड, दि. ४ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी! त्यांच्या पेन्शनसंबंधी विविध अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही अदालात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी, म्हणजेच ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणार आहे.
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणींचे निवेदन या अदालतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी एकच व्यासपीठ उपलब्ध होणार असून, त्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










