नांदेड, दि. ५ डिसेंबर २०२५ (प्रतिनिधी) माधव वाघमारे अपर पोलिस अधीक्षक सुरज पांडुरंग गुरव लिखित ‘विद्यार्थी श्रम’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा येत्या रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. ते सायं. ७ वा., शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थी जीवनातील शिस्त, श्रम संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाची मांडणी करणाऱ्या या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
- मा. श्री. सुनील वेदपाठक
(प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड)
प्रमुख पाहुणे
- मा. डॉ. श्री. मनोहर चासकळे
(कुलगुरू, स्वा.रा.ती.वि. विद्यापीठ, नांदेड) - मा. श्री. शहाजी उभाडे
(पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र) - मा. डॉ. श्री. सुरेश सावंत
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
प्रमुख उपस्थिती
- मा. श्री. राहुल कडूळे (भाप्रसे)
(जिल्हाधिकारी, नांदेड) - मा. श्री. अजीमाशा मुबारक (भाप्रसे)
(पोलीस अधीक्षक, नांदेड) - मा. श्री. महेश होडगे (आय.ए.एस.)
(मुख्य अधिकारी, नगर परिषद, मण्माड) - मा. श्री. मनोज बोऱ्हाडेकर
(लेखक–संपादक, काटकोर)
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
या प्रकाशन सोहळ्यात शिक्षण, प्रशासन आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची एकत्र उपस्थिती असल्याने कार्यक्रमाबद्दल मोठी उत्सुकता आहे. विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे हे पुस्तक सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि श्रमसंस्कारांची मूल्ये उलगडणारे आहे. कार्यक्रमात लेखक सुरज गुरव यांचे मार्गदर्शन, पुस्तकातील विविध पैलूंची चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
लेखकाचा संदेश
पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर, विद्यार्थी, वाचक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन
अपर पोलिस अधीक्षक सुरज पांडुरंग गुरव यांनी केले आहे.












