aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, September 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, September 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

Aawaz Times by Aawaz Times
June 19, 2026
in क्राईम
0
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
0
SHARES
378
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड १९ जून प्रतिनिधी
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार नियमित नाकाबंदी करण्यात येत आहे. या दरम्यान, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेत नाकाबंदी करत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. भाग्यनगर पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत कारसह ३ आरोपींना अटक केली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.
शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान
भाग्यनगर पोलीस स्टेशन अंतर्गत राजकॉर्नर येथे दिनांक १८/०६/२०२६ च्या रात्री २३:00 वाजेपासून ते १९/०६/२०२६ च्या पहाटे ०३:०० वाजेच्या दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्री अंदाजे २३:४५ वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या हॅरियर कार (क्रमांक एम.एच.-२६ सी.व्ही.- ९८९८) चालकाने वाहन तपासणीसाठी पोलिसांनी थांबवले असता, त्याने व त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी पोलीस निरीक्षक संतोष तांबे व अंमलदारांशी हुज्जत घालत वादविवाद केला.
आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करत आरोपी क्र. १ याने आपल्या ताब्यातील कार पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये सपोनी जावेद शेख (पो.स्टे मुखेड) हे जखमी झाले आहेत. यासोबतच आरोपींनी आय.टी.आय चौकातील बॅरिकेडिंग तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आणि फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ केली.
आरोपींचा पाठलाग करून अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा पाठलाग केला. गुरुद्वारा परिसरातून गुन्ह्यात वापरलेल्या २५,00,000/- रुपये किमतीच्या हॅरियर कारसह ३ आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची नावे:
१) तरणजितसिंग अमरिपसिंग बल (वय १९ वर्षे, रा. भगतसिंग रोड, नांदेड)
२) अमरिंदसिंग कुलप्रतापसिंग कपुर (वय १९ वर्षे, रा. शहिद भगतसिंग रोड, नांदेड)
३) हर्षदिपसिंग नरेंद्रसिंग सुखई (वय १९ वर्षे, रा. अबचलनगर, नांदेड)
४) परविंदरसिंग उर्फ अंगद बसंतसिंग नेहंग (रा. भगतसिंग रोड, नांदेड) – (या आरोपीचा शोध सुरू आहे)
या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२0२६ अन्वये कलम १३२, १२१ (२), १0९ (१), ३५२, ३५१ ३,(५) सह कलम १८४ एम.व्ही अ‍ॅक्ट, आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक १ ते ३ यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी बालाजी महाजन हे करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व कौतुक
ही धडक कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्रीमती. अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. श्री. सुरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड) आणि मा. श्री. रामेश्वर व्यंजने (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद देशमुख, पो.उप.नि. नरेश वाडेवाले, पो.उप.नि. साहेबराव कसबेवाड, पो.हे.कॉ/विशाल माळवे, पोकॉ/विष्णुकांत मुंढे, सुधाकर मरदोडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, आदनान पठाण, अंकुश कांबळे सर्व नेमणूक पो.स्टे. भाग्यनगर नांदेड, व क्यु.आर.टी पथक नांदेड यांनी केली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
विशेष वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
Next Post
नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved