देगलूर (जि. नांदेड) : देगलूर शहरातील मंडळी शिवार येथील नदी पात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 31/08/2024 रोजी सकाळी 09:15 वाजता बाजाज चौक येथील नदी पात्रामध्ये अंदाजे 30 ते 40 वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळाली.
मृत इसमाचे वर्णन असे आहे :
- उंची: अंदाजे ५ फूट ५ इंच
- वय: अंदाजे ३० ते ४० वर्षे
- वर्ण: सावळा
- वस्त्र: उजव्या हातात पांढऱ्या धाग्याचे कडे, काळसर रंगाचा शर्ट व त्याच रंगाची पँट
- शरीर बांधा: मध्यम
- केस: काळे
- पादत्राणे: चप्पल नाही
सदर अज्ञात इसमाची ओळख पटवून देणाऱ्यांनी पोलिस स्टेशन, देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
संपर्क क्रमांक: ०२४६६-२५५००० / ९३२००६५५५५











