📰
नांदेड (प्रतिनिधी):
नांदेड जिल्ह्यात श्री गणेशोत्सव विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही सण शांततेत, सुखरूप आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडले. जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवली.
श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त संपूर्ण जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये –
- अपर पोलीस अधीक्षक – २
- उप विभागीय पोलीस अधिकारी – १०
- पोलीस निरीक्षक – ३७
- सहाय्यक निरीक्षक / उपनिरीक्षक – २०८
- पोलीस अंमलदार – २५५६
- आरसीपी प्लाटून – ०५
- एसआरपीसी प्लाटून – ०३
- होमगार्ड – १३०५
यांच्या सेवेमुळे जिल्ह्यातील ३७१९ गणेश मंडळांचे विसर्जन कोणत्याही अनुचित घटना न घडता पूर्ण झाले. यावेळी १२०८ आरोपींवर कलम १०७, ११६(३), १५१ भादंवि प्रमाणे कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून मुस्लिम समाजातील प्रमुख, धर्मगुरू, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन परस्पर चर्चा करण्यात आली होती. परिणामी, ४१ ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकाही शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्या.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार यांनी या यशस्वी बंदोबस्ताबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे तसेच नागरिकांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.












