नांदेड (प्रतिनिधी) –
भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चातर्फे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे भव्य “नमो युवा रन” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण, भोकर विधानसभा आमदार जयाताई चव्हाण, नांदेड महानगराध्यक्ष अमर भाऊ राजुरकर, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभाग घेत या उपक्रमाला विशेष यश मिळाले. मॅरेथॉनच्या माध्यमातून “नशामुक्त भारत” या जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत असून आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. व व्यंकोबा बागल यांनी पण अभिनंदन केले.












