नांदेड (दि.१ ऑक्टोबर) – नांदेड पोलिसांनी अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹४,४०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान MH-22-AN-4342 महिंद्रा कंपनी चा पिकअप वाहनातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून वाहनासह पाच गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली.
या कारवाईत वाहनाची किंमत सुमारे ₹३,००,०००/- तर जनावरांची किंमत ₹१,४०,०००/- असून एकूण ₹४,४०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी १ शेख सोहेल शेख रफिक वय न(२५ वर्षे ) वाहन चालक राहणार इकबाल नगर नांदेड २ नवाज खान फिरोज खान व्यवसाय हेल्पर राहणार इतका रोडनांदेड(३० वर्षे) उमर कुरेशी सलीम कुरेशी(२६ वर्षे) राहणार खंडोबा नगर वाघी नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक नांदेड यांनी केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल भाग्यनगर पोलीस श्री संतोष तांबे पोलीस निरीक्षक महेश माळी पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक नरेश वाडेवाले पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल माळवे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किडे पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती घुले पोलीस कॉन्स्टेबल पठाण पोलीस कॉन्स्टेबल विष्णुकांत मुंडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल लाटकर पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ चापके लिस्टिंग सिंगल मा श्री अबिनाश कुमार सर यांनी अभिनंदन केले आहे












