नांदेड, दि. 30 सप्टेंबर :- जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ४ एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील विशेषत: किनवट व माहूर तालुक्यातील इच्छुक शेतमालकांनी शासन निर्णय क्र. भुवायो-2018/प्र.क्र.127/का-14, दि. 28 जुलै 2021 मधील परिच्छेद क्र. 02 व परिशिष्ट-ब नुसार शेती विक्रीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर अर्ज व आवेदनपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि. नांदेड यांच्या कार्यालयातील माहिती सुविधा केंद्रामध्ये भरून कार्यालयीन वेळेत 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्रा दोन्तुला यांनी दिली आहे.
👉 इच्छुकांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2025.












