मुदखेड / नांदेड ६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठे हत्यार उगारले. मुदखेड पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत तब्बल ६० लाख रुपयांचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन पल्स आउट तहत जिल्हाभरातील वाळू माफियाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर या कारवायांना वेग आला आहे. त्यानुसार मुदखेड तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे आज ६ नोव्हेंबर रोजी सकाळी अंमली ५ वाजल्यापासून संयुक्त पथकाने छापा टाकला.
या ठिकाणी अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरत असलेली विविध साधने व यंत्रणा आढळून आली. त्यात :
- पाच छोट्या बोटी – ३,५०,०००/-
- तीन ट्रॉली – २,००,०००/-
- वाळू उपसा इंजिन – ३०,०००/-
- मोठा पंप (मोठा फायर पंप) – २०,०००/-
मिळून असे अंदाजे ६० लाख रुपयांचे अवैध साहित्य महसूल व पोलिसांच्या पथकाने जागेवरच नष्ट केले.
या कारवाईत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी यांनी सहभाग घेतला. संयुक्त पथकाने हद्दीत गस्त वाढवून अवैध वाळू उपशावर कठोर पाऊले उचलण्यासंदर्भात पुढील कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.












