नांदेड १२ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजीराबाद व इतवारा यांच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवत मोठी कारवाई केली. अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहनचालक, रस्त्यावरील फळांच्या गाड्यांचे अतिक्रमण तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर एकूण 284 प्रकरणे दाखल करून दंड आकारण्यात आला.
🔹 पोलीस अधिकारी अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार मोहीम
माननीय पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड शहरात वाढत असलेल्या ट्रॅफिक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवैध प्रवासी वाहतूक, ऑटोचालकांची गणवेशाविना सेवा, परवाना नसलेली वाहने, फटाका बुलेट, फळांच्या गाड्यांमुळे निर्माण होणारा अडथळा यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
🔹 11 डिसेंबर रोजीची संयुक्त तपासणी मोहीम
प्रभारी अधिकारी श्री. राजकुमार हिंगोले, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा इतवारा यांच्या नेतृत्वाखाली स्टाफ, दंगल नियंत्रण पथक व महानगरपालिका पथकाने
जुना मुंडा, हबीब टॉकीज, बर्फी चौक, सराफा मार्केट येथे वाहन तपासणी मोहीम राबवली.
- वाहन कागदपत्रांची पडताळणी
- ऑटो चालकांना गणवेशाविषयी सूचना
- रस्त्यावरील फळांच्या गाड्यांवर कारवाई
- 23 प्रकरणांमध्ये दंडात्मक कार्यवाही
- अवैध प्रवासी वाहतूक व इतर मिळून 125 केसेस
🔹 वजीराबाद वाहतूक शाखेची वेगळी मोहीम
प्रभारी अधिकारी श्री. साहेबराव गुट्टे, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा वजीराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट व कलामंदिर परिसरात कारवाई.
- वाहन तपासणी व कागदपत्र पडताळणी
- ऑटोचालकांना गणवेशाबाबत सूचना
- फळांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई
- 28 प्रकरणांमध्ये दंड वसुली
- अवैध वाहतूकासह 159 केसेस
🔹 एकूण धडक कारवाई 284 प्रकरणे
वजीराबाद व इतवारा वाहतूक शाखेच्या संयुक्त मोहिमेत
👉 अवैध प्रवासी वाहतूक
👉 विनापरवाना परवाना/परमिटशिवाय वाहने
👉 फळांच्या गाड्यांचे अतिक्रमण
👉 भरधाव वेगाने चालवली जाणारी वाहने
👉 ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन
या सर्वांवर मिळून 284 प्रकरणे दाखल करून दंड आकारण्यात आला.
🔹 नागरिकांना वाहतूक शाखेचे आवाहन
- वाहने रस्त्यात न उभी करता फक्त पार्किंगमध्येच पार्क करावीत
- रस्त्यावर फळांच्या गाड्याद्वारे अतिक्रमण टाळावे
- सिग्नलचे काटेकोर पालन करावे
- वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कोणतीही कृती टाळावी
- नियमभंग केल्यास मोटार वाहतूक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल
ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजीराबाद, इतवारा व दंगल नियंत्रण पथक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.












